म्हसळा ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची हेळसांड : ग्रामिण रुग्णालयाला कायमस्वरुपी वैद्यकिय अधिक्षक मिळावा या मागणीला बळ
रायगड वेध संजय खांबेटे, म्हसळा
म्हसळा तालुक्यांत ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन तब्बल ८ वर्षे होऊनही कायमस्वरुपी वैद्यकिय अधिक्षक आणि वैद्यकिय आधिकारी नसल्यामुळे आशेने सेवा मिळावी म्हणून येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होते आशी स्थिती सातत्याने होत असते.आज सकाळ पासून जेष्ठ नागरिक, गरोदर माता,स्वनदा माताआणि रुग्णांची प्रचंड गर्दी असताना केस पेपर काढायला क्लार्क,रुग्णाना दिशा देण्याबाबत मार्गदर्शक, नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत होती तर तात्पुरता सेवेतील एक वैद्यकीय अधिकारी आणि अपुरे कर्मचारी सेवेत होते. ग्रामिण रुग्णालयाला कायमस्वरुपी वैद्यकिय अधिक्षक आणि कायम स्वरुपी वैद्यकिय आधिकारी नसल्यामुळे आज रुग्णांची प्रचंड हेळसांड झाली, लाखो रुपये खर्च करून रुणाना पुरेसी बसण्याची सोय आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा नसल्यामुळे रुग्णांची प्रचंड नाराजी आहे. बुध. दि .२१ सप्टें. रोजी सकाळच्या सत्रांतच किमान १२१ रुग्ण होते, त्यामध्ये गरोदर महीला, स्तनदा माता, सर्वसामान्य महीला, जेष्ठ नागरिक या दर्जाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते, या सर्व रुग्णाना मात्र अनेक गैरसोयीना तोंड द्यावे लागत आहे.पार्कींग, केस पेपर, डॉक्टर, पॅथॉलॉजीस्ट या सर्वच विभागात रुग्णसेवेचा बोजवारा वाजला होता.
" म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत स्थापने पासून प्रभारी अधीक्षक, प्रभारी वैद्यकीय आधिकारी ह्यांच्यामुळेच रूणांच्या गैरसोयी होत आहेत त्यानाच रुग्णालयांचा कायम स्वरुपी कार्यभार द्यावा म्हणजे जबाबदारीने काम होईल"
महादेव पाटील. मा. सभापती पं.स. म्हसळा