पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे भाजपाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ पिशव्या रक्ताचे केले संकलन
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे व रक्तदान करुन मानवतावादी कार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे भाजपाच्या वतीने नेरुळ येथील प्रसिद्ध डॉ. डी वाय पाटील रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने नागोठण्यातील श्री जोगेश्वरी माता मंदिराजवळील डाॅ. कुंटे यांच्या दवाखान्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या रक्तदान शिबिरात नागोठणे शहर व विभागातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. त्यामुळे या रक्तदान शिबिरात नागोठणे शहर व ग्रामीण विभागातील अधिकाधिक इच्छुक रक्तदात्यांनी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून सहभाग नोंदवत रक्त संकलनाच्या पवित्र कार्यास सहकार्य केल्यानेच सुमारे ६४ पिशव्या रक्ताचे संकलन डॉ. डी वाय पाटील रुग्णालयातील रक्तपेढीच्या उपस्थित टिम कडून यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.
दरम्यान या रक्तदान शिबिरास भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यासह दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, उपाध्यक्षा श्रेया कुंटे, तालुका सरचिटणीस आनंद लाड,संजय लोटणकर, मा. जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, नागोठणे विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, प्रमोद गोळे, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष अशोक अहिरे, तालुका उपाध्यक्ष विठोबा माळी,शेखर गोळे,अपर्णा सुटे, सिराज पानसरे, सुभाष पाटील, संतोष लाड, विवेक रावकर,तिरथराव पोलसानी,मोरेश्वर म्हात्रे,महिला शहराध्यक्षा शितल नांगरे, सोशल मीडिया संयोजिका प्रियंका पिंपळे, मुग्धा गडकरी,निलिमा राजे यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागोठणे येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील रक्तपेढीच्या रक्तपेढी प्रशासक तथा वरिष्ठ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या प्राची नायर, डॉ. सुमेधा शिंदे, डॉ. मेलवीन, टेक्निकल विभागाचे राजेश पाटील,स्टाफ नर्स सुचीता अग्रवाल, टेक्निशियन निलेश खानोलकर व आरती भोंग आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तर हा रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न होण्याकरिता नागोठणे भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.