सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या स्थापना दिन उत्साहात साजरा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण
रायगड वेध ऋषाली पवार लोहारे
पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय मध्ये अनेक खेडेगावातील विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. पदवीधर शिक्षण या विद्यालयाद्वारे घेता येत आहे अल्पशिक्षण फी व प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे अनेक गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे अशा ठिकाणी जाण्याच्या आवश्यकता भासत नाही .त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षक पूर्ण करता येत आहे.
२१ सप्टेंबर बुधवार रोजी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे कला ,वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालयाच्या स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालय संदर्भ पुस्तके आणि शिवाई वार्षिक अंक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन विभागाचे प्रमुख डॉक्टर नथिराम राठोड यांनी आपल्या मनोगतामध्ये २५ वर्षाच्या कालावधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून गेलेल्या अनेक विद्यार्थी पोलीस खाते, लष्कर , एटीएस ,औद्योगिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्र आदी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याचे नमूद केले कार्यक्रमा निमित्त महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेणारा स्वरचित पोवाडा सादर केला.
शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड संतोष काळे, सचिव श्री अशोकबंधू देशमुख, खजिनदार श्री किशोर मोरे ,यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाला यांनी लिहिलेल्या मानवी भूगोल कृषी भूगोल व पर्यावरण भूगोल या संदर्भ पुस्तकांचे प्रकाशन तसेच महाविद्यालयाच्या शिवाई या डिजिटल स्वरूपातील वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले प्राध्यापक सुनील बलखंडे प्राध्यापक डॉक्टर मंगेश गोरे, प्राध्यापक स्नेहल कांबळे, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .