मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने डोंगराचा काही भाग काढण्यात आला होता अचानक पावसाची तीव्रता वाढल्याने डोंगराचा काही भाग कोसळला. त्याच्या लगत असलेली लोकवस्ती व चोळई गाव तेथील नागरिकांना पोलादपूर पोलीस कर्मचारी, तहसील कार्यालय नाईक तहसीलदार, नरवीर ग्रुप रेस्क्यू टीम, घटनास्थळी धाव घेऊन चोळई गावच्या नागरिकांना विद्यामंदिर महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आले.
पावसाची तीव्रता वाढल्याने सावित्री नदी तुडुंब पाण्याने भरली होती गेल्या वर्षी पोलादपूर शहरातील नदी जवळील असलेले लोकवस्ती, बाजारपेठ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पाणी पातळी पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. परंतु आता कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
तहसील कार्यालयातील नाईक तहसीलदार देसाई, पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत जाधव आशिष नटे परेश मोरे नारायण दराडे नितेश कोंढाळकर व नरवीर ग्रुप रेस्क्यू टीम अध्यक्ष रामदास कळंबे साहेब व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रसंग अवधान राखून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.