मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर येथील सर्विस रोड खचला स्थानिक दुकानदार त्रस्त.
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
मुंबई गोवा महामार्ग चे कामगिरी दोन वर्ष सुरू आहे पोलादपूर येथील अंडरपास देखील एका बाजूने सुरू करण्यात आला आहे तसेच दुसऱ्या बाजूने अंडरपास सुरू करण्यासाठी काम सुरू आहे परंतु त्यावरती असलेला सर्विस रोड काम सुरू असल्याने काही प्रमाणात खचत आहे सुरक्षेसाठी सर्विस रोडा बंद करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू असल्याने सर्विस रोड वर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे व त्यामुळे चिखल पावसाचे पाणी साचले आहेत सर्विस रोड खचल्यामुळे बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्या बाजूस जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने तेथील दुकानदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
सर्विस रोड बंद असल्याने ग्राहक त्या बाजूस आहे शक्य होत नसल्याने तेथील दुकानदारांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे गेली काही वर्ष महामार्गाचे काम हे सुरूच आहे त्यामुळे खड्डे पडत आहेत त्यामुळे वाहन चालक तसेच स्थानिक नागरिक व तेथील दुकानदार यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.