वन विभाग म्हसळा तालुक्यांत १लक्ष २५ हजार
वृक्ष लागवड करणार : १०० % देशी वृक्ष लागवड होणार
रायगड वेध संजय खांबेटे, म्हसळा
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहे हे नव्याने सांगणे नको. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठय़ा प्रमाणात विचारमंथन होत आहे. त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून शासन पातळीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत असतो त्याच पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागा मार्फत १लक्ष २४ हजार४४ वृक्ष लागवड करणार असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी संजय पांढरकामे यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले, यामध्ये शिवण,खैर,हिरडा, बांबू,आवळा,शिसू, काजू,चिंच,सिताफळ,टिटव या प्रजातीची देशी वृक्षरोपे स्थानिक नर्सरीत तयार केलेली लावण्यात येणार आहेत, वन विभागा मार्फत १ लक्ष ९ हजार ९८९, तर सामाजिक वनीकरण मार्फत १४ हजार ५५ उत्कृष्ट / सशक्त रोपे लावण्यात येणार आहेत वन विभागा मार्फत कुडतोडी, कांदळवाडा, देहेन, सरवर, पाष्टी, वरवठणे, येथील वनक्षेत्रांत, सामाजिक वनीकरण मार्फत रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड या योजनेंतून सकलप ते वडवली या ९ कि.मी. , म्हसळा ते घोणसे, पाष्टी ते वांगणी, म्हसळा -श्रीवर्धन बाह्य वळण रस्ता, या रस्त्यावर दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात येणार आसल्याचे लागवड आधिकारी पाटील यानी सांगितले, ७ जुलै ते १५ जुलै या कालावधीत तालुक्यांतील सर्व विभागाचा एकत्रित सहभाग घेऊन वृक्ष लागवड करण्यात येणार आसल्याचे समजते.
"मागील काही वर्षांत म्हसळयांतील लोक प्रतिनिधी,स्वयंसेवी संस्था,आणि जनतेने वृक्ष लागवड ही लोकचळवळ म्हणून सिद्ध केली. गेल्या तीन चार वर्षात याचा सकारात्मक परिणाम दिसला आहे,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व जनतेला अधोरेखित झाले आहे. परंतु नव्याने शासनाला जनतेचा सहभाग नको असतो याची खंत व्यक्त होते ."