कै.रोहित कडव याच्या स्मरणार्थ अभि युवा ग्रुप देवन्हावे यांनी केले वृक्षरोपण
रायगड वेध समाधान दिसले खालापूर
देवन्हावे गावातील सामाजिक कार्य करणारा अभि युवा ग्रुप मधील सदस्यांनी काही महिन्यांपूर्वी देवन्हावे गावामधील तरुण मित्र कै रोहित कडव याचे निधन झाले असून कै.रोहित याची आठवण कायम स्मरणात रहावी या करिता सामाजिक उपक्रम म्हणून देवन्हावे गावात 50 झाडांची लागवड करून समाजाला वृक्ष लागवडीचा एक संदेश दिला.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक सुदाम नलावडे, मधुकर पाटील तसेच अभि युवा ग्रुपचे सदस्य अतिष पाटील, यश पाटील, अंकुर भोपतराव, अँड.जयेश तावडे, राज पाटील, चेतन चौधरी, शिवम नलावडे, अतिष पाटील, कुणाल पाटील, साहिल पाटील, रोहित नलावडे, नितेश चौधरी आदीप्रमुख उपस्थित होते.
खालापूर तालुक्यामधील देवन्हावे येथील अभि युवा ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने कार्य करित गोरगरीबांना मदतीसह समाजात समाजप्रबोधनाचे काम करित असताना सध्या परिस्थितीत वृक्ष लागवड ही काळाजी गरज असून ही गरज ओळखून कै.रोहित कडव याच्या स्मरणार्थ देवन्हावे गावात जवळपास 50 झाडांची लागवड करित या झाडांची संवर्धनाची जबाबदार घेऊन सर्वाना वृक्ष करण्याचे आवाहन केले असून प्रत्येकाने एक तरी झाड आपल्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत परिसरात लावावे जेणेकरून भविष्यात हवामान व्यवस्थित राहील व ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असा संदेश या निमित्ताने दिला आहे.