सामाजिक उद्दिष्टपूर्तीची पिरकोन प्रिमिअर लीग-२०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न.
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या वतीने रविवार ३ जुलै रोजी ‘पिरकोन प्रिमिअर लीग(PPL) या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामन्यांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तांडेल, लेखक कवी अजय शिवकर, सुनिलजी वर्तक, दिनेश्वर गाताडी तसेच माजी जि.प.सदस्य जिवन गावंड यांचे हस्ते झाले. पावसाच्या धुंद वातावरणात रंगलेल्या या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. शानदार खेळ करत केमंता स्पोर्ट्स हा संघ विजेता ठरला तर अल्पेश- रामचंद्र स्पोर्ट्स या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले. सामान्यांत उत्कृष्ठ गोलंदाज मंगेश लक्ष्मण पाटील तर उत्कृष्ठ फलंदाज आणि मालिकवीराचा किताब प्रसाद मधुकर गावंड यास मिळाला.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या वेळी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे पदाधीकारी रवींद्र भोईर, भूपेंद्र पाटील आणि प्रांजल पाटील हे उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बॉटॅनिकल गार्डनची’ निर्मिती करणे या कामासाठी होणार आहे. परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पर्धेस भेट दिली तसेच सदिच्छा देखील व्यक्त केल्या.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही पिरकोणकर समूहाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली आणि चेतन गावंड यांनी सर्वांचे आभार देखील मानले.