Type Here to Get Search Results !

नेवरूळ हायस्कूल 10 वी चा निकाल 100%, घुम गावची कु.कृपा श्रीधर दर्गे 82.80% गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक


नेवरूळ हायस्कूल 10 वी चा निकाल 100%

◆ 6 वर्ष 100% निकालाची परंपरा कायम

● घुम गावची कु.कृपा श्रीधर दर्गे 82.80% गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक 


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा



   म्हसळा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचालित न्यु इंग्लिश स्कुल नेवरूळ विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 100% लागला असून मागील सहा वर्षाची परंपरा कायम राखण्यात सर्व विद्यार्थ्यांना यश आले आहे.
    शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता दहावी ला 20 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी 07 मुली व 13 मुले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झालेले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधे 75 %टक्के च्या पुढील 07 विद्यार्थी आहेत. 60% ते 75% चे 12 विद्यार्थी आहेत. 35% ते 60% चे 01 विद्यार्थी आहे.
   नेवरूळ हायस्कूल मध्ये घुम गावची कु.कृपा श्रीधर दर्गे हिने 82.80% गुण मिळवून हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे तर रुद्रवट गावची कु.चांदणी गणेश आग्रे हिने 79.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि ठाकरोली गावचा कु.गौरव गणेश जाधव याने 78.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
   सतत सहा वर्षे नेवरूळ हायस्कूलचा दहावीचा निकाल 100% लागत असल्याने विद्यार्थी व शिक्षक यांचे हायस्कूलचे आजी-माजी विद्यार्थी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांसह सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test