दिवेआगर येथे कामगार युनियन कमिटी मेंबर्सचे पावसाळी वार्षिक अधिवेशन संपन्न
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यातील व भविष्यातील जागतिक दर्जाच्या अदानी पोर्टच्या कामगार युनियनच्या युनिटने केलेल्या नियोजनात जनरल कामगार युनियन कमिटी मेम्बर्स संघटनेच्या आठ युनिटचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि.८ जुलै २०२२ रोजी दिवेआगर सुवर्ण गणेशाच्या पवित्रभूमीत भंडारी समाज दिवेआगर येथील स्वर्गीय श्री.सखाराम शिवराम शिलकर सभागृहा मध्ये वडावकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना राजकुमार कोलथरकर यांनी आपले मनोगत हि व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अध्यक्षांनी अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना कामगारांच्या हिताचे कायदा आणि सुव्यवस्था या विषयी माहिती दिली.
या अधिवेशनात जनरल मजदूर सभा ठाणे,युनियनच्या युनिट दिघी पोर्ट,आगरदांडा टर्मिनल,सोलवे स्पेशलिटी रोहा,कोरस इंडिया रोहा,दीपक नाईट ट्रेड रोहा,बेक केमिकल्स,एफ.डी.सी कंपनी रोहा,युनिकेम लॅबोरेटरीज रोहा,या सर्व युनियनच्या युनिटचे सर्व कमिटी मेंबर्स यांचे पावसाळी वार्षिक स्नेहसंमेलनात युनियनच्या अध्यक्षा सौभाग्यवती संज्योत वढावकर मॅडम उपस्थित होत्या.युनियनचे जनरल सेक्रेटरी संजयजी वढावकर साहेब,निवृत्त लेबर कमिशनर जोशी साहेब,कदम साहेब,खरीवले साहेब,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.उपस्थितांचे आभार कदम साहेब यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे नियोजन दिघी पोर्ट युनिट,युनियन जनरल मजदूर सभा युनियन युनिटचे अध्यक्ष सुरज एकनाथ मांजरेकर,उपाध्यक्ष संदीप दिवेकर,सहाय्यक उपाध्यक्ष अनंत लखमा खोपटकर,सल्लागार राजकुमार अशोक कोलथरकर,चंद्रकांत धर्मा भालदार,अशोक कडू,सेक्रेटरी सत्येंद्र विजय कासारे,मनोहर गणपत पाटील,नरेश रामजी मेंदाडकर,खजिनदार.बाळकृष्ण महादू गुणाजी,आगरदंडा युनिटचे अध्यक्ष विरेंद्र मसाळ,विरेंद्र चिंदरकर,ऋत्विज मकू,सचिन पांगे,प्रथमेश वीरकूड, आदी मान्यवर उपस्थितीत खेळी मेळीच्या आणि आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.