Type Here to Get Search Results !

रँकर्स अकॅडमीमधे बक्षीस वितरण आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न.


रँकर्स अकॅडमीमधे बक्षीस वितरण आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


दिघोडे येथे वेश्वी व कोप्रोली येथील रँकर्स अकॅडमी इयत्ता 10 वी मार्च 2022 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व मार्गदर्शन शिबिर गुणवंत कामगार विलास शांताराम मुंबईकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक प्रतीक सुधीर मुंबईकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम कम्बा घरत, दीपक रामचंद्र मढवी, पद्माकर जनार्दन पाटील, अनिल शांताराम मुंबईकर, सुधीर शांताराम मुंबईकर, सनी बोरसे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील व कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे उपस्थित होते. 
मार्गदर्शक पाहुणे म्हणून प्रशांत गजानन पाटील, डॉक्टर एकता मिलिंद पाटील, जगत भरत घरत उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक प्रतीक सुधीर मुंबईकर यांनी यावर्षी संस्थेचा निकाल 100% लागला असून विशेष प्राविण्य 30 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असे सांगितले. प्रथम क्रमांक यश दीपक पाटील 89% , द्वितीय क्रमांक सिमरन विलास मुंबईकर 88.40%, तृतीय क्रमांक सानिका मिलिंद पाटील 87.80% गुण मिळाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना चषक व सर्टिफिकेट देऊन पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी पालक दीपक पाटील विलास जनार्दन मुंबईकर व मार्गदर्शक शिक्षक मिताली मुंबईकर, रचना ठाकूर, समाधान पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test