म्हसळा शहरांत शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्या साठी विशेष मोहीमेत विद्यार्थाचा सहभाग
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
मिशन झिरो ड्रॉप आउट यासाठी शालेय शिक्षण विभागाने ५ जुलै ते २० जुलै या १५ दिवसाचा कालावधी दिला आहे हे मिशन पूर्ण आणि यशस्वी होण्यासाठी शिक्षकांच्या बरोबरीने म्हसळा प्रा.शाळा नं१ च्या ३ री आणि ४ थीतील विद्यार्थानी रॅलीत सहभाग घेऊन शहरांत जनजागृती केली यावेळी त्यानी शहरांतील सर्व नागरिकांचे लक्ष वेधत आम्ही आमच्या शाळाबाह्य भावाना मित्राना शाळेत चला असे सांगायला आलो आहोत असे सांगितले. यावेळी त्यानी उस्फुर्त घोषणा दिल्या. या जनजागृती फेरीची सांगता म्हसळा तहसील कार्यालयाचे प्रांगणात झाली तहसीलदार समीर घारे आणि महसुल कर्मचाऱ्यानी विद्यार्थाना खाऊ वाटून सांगता केली, यावेळी कृषी आधिकारी मंगेश साळी,अशोक बाक्कर,केंद्र प्रमुख राहुल नाईक, दिपक पाटील, किशोर पैलकर, संदीप भोनकर, नंदकुमार जाधव, शिक्षीका रुचिता मेहता उपस्थित होत्या.रॅलींत ४थी आणि ३री च्या संस्कृती दर्गे,अनया सहावे, प्रणय नरके, फैजान शहा, आर्यन चव्हाण,साईश्री म्हात्रे,ओमप्रकाश जावळे, श्रृतीका माने या विद्यार्थानी सहभाग घेतला.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा आधिकार अधिनियम २००९ त्यानुसार शाळा बाह्य मुलाना नियमित शाळेत दाखल करणे आणि उपस्थिती टिकवून ठेवणे याच बरोबरीने
एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी हंगामी स्थलांतरित होऊन येणाऱ्या कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी जवळ असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करणे संबंधीताना बंधनकारक आहे मोलमजुरीसाठी आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन येत असतात तसेच त्यांच्या समवेत सहा वर्ष ते चौदा वर्ष वयोगटाची बालके देखील स्थलांतरित होऊन येतात केंद्र व राज्यशासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी आणि बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत सुरु आहे.
फोटो. भर पावसांत म्हसळा प्रा.शाळा नं१ च्या ३री आणि ४थीतील विद्यार्थाचा रॅलीत सहभाग, समवेत तहसीलदार घारे आणि विविध कर्मचारी.