ऑन लाईन वॉशींग मशीन खरेदी करण्याच्या नादात म्हसळयातील अ. समद कौचाली यांची तब्बल रु ५४,९९७ झाली फसवणूक.
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
ऑन लाईन वॉशींग मशीन खरेदी करणाऱ्या अ.समद कौचाली रा.तोराडी बंडवाडी या ग्राहकाने कस्टम केअरच्या माध्यमांतून डीलेव्हरी ट्रॅक करताना कुरीअरचा शोध घेता घेता फोन केला असता कौचाली याना
रु ५४ हजार ९९७ चा गंडा बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची नोंद अ.समद कौचाली यानी जिल्हा पोलीस अधिक्षकांचे सायबर सेल विभागा कडील बँकआर्थिक फसवणूक शाखेकडे ऑन लाईन केली आहे. सदची घटना तोराडी (ता.म्हसळा) येथे शुकवार दि.१जुलैला रात्री ११.४८ ते ११.५६ या कालावधीत घडली.काही मिनीटांचे फरकाने ४ एंट्री करून कौचाली यांचे आंबेत येथील स्टेट बँक ऑफ इडीयाचे बचत खात्यातील रक्कमेवर सायबर गुन्हेगारानी डल्ला मारला.
कौचाली यानी डीलेव्हरी कुरीअर चा मोबाईल क्र. ७८७२८९९१६८ यावर फोन लावला असता त्यानी पुढील चौकशी मोबा क्रं ८८२६९५५१२२ केली असता त्यावर Contact Name LikelySpan आसल्याचे कौचाली यानी सांगितल. या नंबर वरून विशाल कुमार यांचा मोबा नंबर आणि Linkदेण्यात आली आणि आमचा घात झाल्याचे कौचाली यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले.
" घडल्या प्रकाराची नोंद ऑन लाईन पध्दतीने करूनही तब्बल ४८ तास झाले तरी अद्याप कोणतीच कारवाई / तपास झाला नाही याची खंत वाटते ४ एंट्री होऊन कौचाली यांचे आंबेत येथील स्टेट बँक ऑफ इडीयाचे बचत खात्या तील रक्कम रु ५४ हजार ९९७ ही एकाच खात्यांत Transfer ने गेली आसल्याचे समजते."
" म्हसळा तालुक्यात आंबेत, सणदेरी,तोराडी , पांगळोली, मेंदडी,पाभरे या परिसरांतील गावांतून सायबर गुन्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे."