श्रीवर्धन प्रशासकीय यंत्रणेकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी
सजग रहा सावधान रहा... सचिन गोसावी तहसीलदार श्रीवर्धन यांचे सर्वसामान्य जनतेला आवाहन
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
जुलै च्या पहिल्या आठवड्यापासून श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र पावसाने जोर पकडला आहे. आपणास पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका जाणवल्यास तात्काळ आपत्ती कक्षाशी संपर्क साधा .सजग रहा, सावधान रहा आपल्या मदतीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन श्रीवर्धन चे तहसीलदार सचिन गोसावी यांनीकेले आहे.
दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करत असताना स्थानिक नागरिकांशी सचिन गोसावी यांनी संवाद साधला. गोसावी यांनी सांगितले कुडगाव आदिवासी वाडी च्या लगत मोठा डोंगराळ भाग आहे पावसाळ्यात डोंगराच्या वरील बाजूनीं सर्व पाणी वाडी कडे येते त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
श्रीवर्धन तहसील कार्यालयात आपत्ती कक्षाची स्थापना करण्यात आली . कोणतीही समस्या जाणवल्यास तात्काळ आपत्ती कक्षाशी संपर्क साधावा . श्रीवर्धन शहरातील धोंड गल्ली , गणेश आळी, विठ्ठल आळी या दरड प्रवण क्षेत्रातील स्थानिक व्यक्तींशी संवाद साधण्यात आला. तहसीलदार सचिन गोसावी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी,मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर, मंडळ अधिकारी सुनील पाटील ,तलाठी अर्जुन भगत यांच्या पथकाने प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीवर्धन शहर , कुडगाव, हरवीत अशा विविध ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रातील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन स्थानिक परिस्थितीची पाहणी केली आहे .