आपत्ती व्यवस्थापनात पारदर्शकता व प्रशासनांत गतीमानता यावी म्हणून जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत दूरध्वनी सेवे सोबत मोबाईल सेवा कार्यान्वित.
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
आपत्ती मानवनिर्मित अथवा निसर्गनिर्मित कोणतीही असो, आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असते याच वेळी प्रशासनाने गतीमान कार्यपध्दतीने गरजुना आत्यावश्यक सेवा- सुविधा मिळावी म्हणून जिल्ह्यांतील सर्व तालुका तहसील कार्यालयांत २४x ७ मियंत्रण कक्ष सुरु केले असून तेथे दूरध्वनी सेवे सोबत मोबाईल सेवा देण्याची पध्दती कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आपत्ती बाबत योग्य संदेश सर्वदूर गतीमानतेने आणि पारदर्शक जाईल लोकांचा सहभाग वाढेल. भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्रशासनाला मदत होईल.
तालुका निहाय तहसील कार्यालय (नियंत्रण कक्ष) त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि मोबा.93क्रं पुढील प्रमाणे.
1)आलिबाग 02141-22054 (8275278218)
2) पेण 02143-252036 (8459482937)
3) मुरुड02144-274026(7020573620)
4) पनवेल 022 -27452399 (8369899902)
5) उरण 022-27222352(9892538409)
6) कर्जत02148 -222037 (9373922909)
7) खालापूर 02192-275048 (8262898788)
8) तळा 02140-269317(7066069317)
9) माणगाव 02140-262632 (7498191244)
10) रोहा 02194-223322(9022970394)
11) सुधागड 02142-242665 (8830333747)
12) श्रीवर्धन 02147-222226 (9284730753,7249579158)
13) म्हसळाO2149-232224 (8459795326)
I4) महाड 02145-222142/222143/ 223783(8263086355)
15) पोलादपूर 02191-240026 (8999067510
आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग , या घटकाला आपत्ती व्यवस्थापनशास्त्रात विशेष महत्व आसल्याने रायगडचे जिल्हाधिकारी यानी दूरध्वनीला पर्यायी सुविधा स्विकारली आहे.