विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन उच्च अधिकारी व्हावे.
- संतोष पवार
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज अनेक शासकीय निमशासकीय नोकऱ्या उपलब्ध आहेत.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावरील अधिकारी सुद्धा सुद्धा होता येते. त्यामुळे सर्वांनी जीवन जगताना उच्च ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च अधिकारी बनून देशाची सेवा करा. समाजाची सेवा करा. जीवन घडविण्याचा स्पर्धा परीक्षा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरावे व यशाचे ध्येय गाठावा असा मौलिक सल्ला उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी दिला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडेमी बोकडविरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बाळासाहेब क्रीडा संकुल सभागृह उरण शहर येथे आयोजित केलेल्या पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष स्थान भूषविणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअर कसे घडवावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्या पोलिस भरती बाबत महाराष्ट्र शासना तर्फे लेखी व शारिरिक परिक्षा बाबत शासन निर्णय (G.R) निघाले असून लवकरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वसाधारणे 7 हजार 231 पदांची जुलै ऑगस्ट मध्ये पोलीस भरती होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस भरतीचे अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यासाठी, पोलिस पदाच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडेमी बोकडविरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल,विमला तलाव गार्डन शेजारी, देऊळवाडीतील दत्त मंदिरा पाठिमागे, उरण शहर येथे महाराष्ट्र पोलिस व सरळसेवा मेगा भरती 2022 लेखी व शारिरिक परिक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात करण्यात आले . शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडमी बोकडविरा या संस्थेचे संस्थापक तथा एन आय एस अथलेटिक्स प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना पोलीस भरती बाबत मार्गदर्शन केले.लेखी परीक्षा तसेच शारीरिक परीक्षेतील बारकावे, लहान सहान गोष्टी, कौशल्य आदी बाबींची उत्तम माहिती प्रशांत पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना, उपस्थितांना दिली.
यावेळी उरण शहरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सचिव प्रेम म्हात्रे,कुमार ठाकूर,हेमंत ठाकूर, सुविध म्हात्रे, शुभम ठाकूर, यश पाटील (खोपटे )आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षा अकॅडेमीचे कर्मचारी वृंद व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना व आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि शिक्षा अकॅडेमीचे संस्थापक प्रशांत पाटील यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.