म्हसळा तालुक्यात कृषी दिन साजरा शेतकऱ्यानी फळबागायतीकडे झुकावे : बबन मनवे.
शेतकऱ्याना भाजीपाला बियाण्याचे केले वाटप.
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी विभाग म्हसळा यांचे संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त कृषि दिन आणि कृषी संजीवनी मोहिम समारोप कार्यक्रम साजरा करण्यात आला.माजी कृषी सभापती बबनशेठ मनवे ,माजी सभापती पंचायत समिती श्रीमती छायाताई म्हात्रे,संदीप चाचले, तहसिलदार समिर घारे,तालुका कृषी अधिकारी,
भाऊसाहेब गावडे ,मंडळ कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती मंगेश साळी
ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड ,प्रगतीशील शेतकरी समिर बनकर सुधिर कवीलकर,चंद्रकांत पवार , कृषी विभागाचे राजेंद्र ढंगारे, भरत कदम,सुजय कुसळकर,धनंजय सरनाईक,गणेश देवडे, आणि शेतकरी वर्ग उपास्थित होते.ता कृ.अ. भाऊसाहेब गावडे यानी शेतकरी, फळ बागायत दार याना कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहीती दिली, तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेचे महत्व सांगितले,कृषि अधिकारी मंगेश साळी यानी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहीती सांगताना सोलर कृषी विज पंप योजनेचा शेतक ऱ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन केले.तालुक्याला लागणारा भाजीपाला तालुक्यातच पिकवावा आणि भाजीपाल्याच्या बाबतीत तालुका स्वयंपूर्ण करावा ,स्थानिक शेतकऱ्यानी फळ प्रक्रिया करण्यावर भर द्यावा असे तहसीलदार घारे यानी सांगितले.आपल्या वरकस, पडिक जामिनीत विविध योजनांतून फळबाग लागवड किंवा वृक्ष, बांबू लागवड करावी असे आवाहन मा. सभापती म्हात्रे यानी केले. यावेळी शेतकरी आणि दुध उत्पादक चंद्रकांत पवार ,प्रगतशील शेतकरी कविलकर यांनी शेतकऱ्याना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले.माजी कृषी सभापती बबनशेठ मनवे यानी शेतकऱ्याने शेती करताना , फळबागायती लागवडीचा आभ्यास करावा सातत्याने पिक देणारे आंबा- काजूच्या विविध जाती,बारमाही फणस, कोकम अशा फळबागायती कडे आपला कल दाखवावा असे आभ्यासू प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाचे माध्यमांतून भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले तसेच पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
फोटो .