पोलादपूर तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल दाखल.
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे काही दिवस रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एनडीआरएफ ची टीम दाखल करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे तसेच पोलादपूर हे डोंगराळ भागांमध्ये आहे त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते व तसेच गेले काही दिवस चोळई, धामणदेवी अशा भागांमध्ये दरडही कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे व सावित्री नदीने आणखी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही परंतु अतिवृष्टी झाल्यास सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते याची खबरदारी म्हणून एनडीआरएफ टीम दाखल करण्यात बाबत कलेक्टर ऑफिस कडून आदेश देण्यात आले आहेत.
पोलादपूर येथे सात जुलै रोजी एनडीआरएफ ची एक तुकडी दाखल करण्यात आली कॉन्स्टेबल शामराव गवळी, इन्स्पेक्टर गौरव चव्हाण असिस्टंट कमांडर निखिल मुधवकर व डॉक्टर देशमुख हवालदार व अन्य अधिकारी अशी एक तुकडी पोलादपूर येथे दाखल करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी एनडीआरएफ टीम, नर्विर ग्रुप रेस्क्यू टीम, तसेच स्थानिक पोलीस प्रशासन यांना पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितले आहे.