Type Here to Get Search Results !

समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी व मोफत आरोग्य तपासणी.


समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांची पाहणी व मोफत आरोग्य तपासणी.


रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर


     समुदाय आरोग्य अधिकारी पळचील ग्रामीण रुग्णालयाकडून पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक गावातील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

     बुधवार दिनांक ६ जुलै रोजी कोतवाल बुद्रुक या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली व रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले. अतिवृष्टी झाल्यास किंवा दरड कोसळल्यास कशाप्रकारे आपला बचाव करावा व दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार कशा प्रकारे करावे अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यास कशाप्रकारे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दामोधर पवार, आरोग्य सेविका भारती सकपाळ, सागर गायकवाड व अन्य सहाय्य कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test