Type Here to Get Search Results !

रायगड जिल्ह्यातील दिघी-पोर्ट म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना आशेचं किरण ? असंख्य तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत


• रायगड जिल्ह्यातील दिघी-पोर्ट म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना आशेचं किरण ? असंख्य तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत

• अदानी ग्रुपने दिघी पोर्टचा ताबा घेतला,मात्र गती कासवाची, अजून किती प्रतीक्षा ? बेरोजगार तरुणांचा सवाल..


• सरकारची पॉव्हरव्हेसल या पोर्टला डॉक होईल का ?


रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर


श्रीवर्धन-मुरुड तालुक्यातील दिघी-राजपुरी खाडीत जागतिक दर्जाचे दिघी-पोर्ट गेले कित्येक वर्षे विकसित होत आहे.मात्र कासवाच्या गतीने विकसित होतांना सुशिक्षित बेरोजगार युवक स्थानिक नागरिकांना मात्र गेली १४/१५ वर्ष जणू चातका सारखी वाट पहावी लागली आहे,अजून किती काळ वाट पाहावी लागणार ? हा प्रश्न आहे.ज्यांच्या मुळे दिघी-पोर्टचे काम पूर्ण करण्यास अपयशी ठरलेले ते विजय कलंत्री यांनी गेल्या वर्ष दिड वर्ष अगोदर दिघी-पोर्ट हे अदानी ग्रुप कडे हस्तांतरीत केल्याचे दिसून येते आहे.दिघी आणि आगरदांडा टर्मिनल या दोनही ठिकाणी अदानी ग्रुपच्या प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी कार्यरत असतात.काही प्रमाणात मंद गतीने पण कामं चालू असल्याचे दिसून येत आहे.मात्र ही मंद गतीने चालणारी कामं जलद गतीने कधी चालू होणार ? जेणे करून प्रतीक्षा करत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार,स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.अशा विविध कारणांनी स्थानिक तरुणांचे स्वप्न अंधारातच आहेत
बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर आधारित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड याच्या भागीदारीने तयार होणारे रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडी मधील दिघी पोर्ट हे बंदर. स्थानिक प्रशासन यांच्या नेतृत्वामुळेच अजूनही धुळखात पडलेला आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,मुरुड,तळा,म्हसळा तालुक्यामधील तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरातील स्थानिक तरुण तरुणांचे स्वप्न अंधारात आहेत..
NCLT कडून १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दिघी पोर्ट चा ताबा अदानी उद्योग समूहाने घेऊन सुद्धा गेली दीड वर्ष होऊनही आदानी सारख्या मोठ्या उद्योग समूहालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दिघी पोर्ट विस्ताराच्या सर्व कामांचा मंजुरी प्रस्ताव नव्याने अदानी समूहाने केंद्रीय पर्यावरण खात्याकडे सादर केलेला आहे.
अदानी समूहाच्या गुजरात येथील मुंद्रा पोर्टच्या एवढी हाताळण्याची क्षमता बनवण्याच्या दृष्टीने अदानी समूहाने दिघी पोर्ट बनवण्याच्या हेतूने दूरदृष्टी ठेवूनच सध्या दिघी पोर्ट व आगरदंडा टर्मिनल. तयार करण्याचे नियोजन केलेले आहे.
राजपुरी खाडीतील गाळ काढला तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर जहाजांच्या वाहतुकीसाठी मार्ग तयार केला जाईल परंतु  ड्रेजिग करून खाडीतील गाळ काढताना अनेक समस्यांना अदानी समूहाला सामोरे जावे लागत आहे.
निश्चितच स्थानिक प्रशासकीय नेतृत्वाने यांच्यामध्ये लक्ष घालून नव्याने उभं राहत असलेल्या पोर्ट मुळे रायगड जिल्ह्यातील असंख्य तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होऊ शकतात.बेरोजगारीचा विषय मार्गी लागेल.
तरुणांच्या स्वप्नांतील केव्हा एकदा दिघी पोर्ट तयार होईल. त्यामुळे इतर उद्योग धंद्यांना चालना मिळेल.निश्चितच मोठी बाजारपेठ तयार होईल लॉजिस्टिक,कोल्ड स्टोरेज,वेअर हाऊस इतर छोटे मोठे व्यवसाय आहेत या सर्व पोर्टच्या विकासा मुळे निश्चितच साध्य होणार आहेत.
याच खाडीत दास ऑप्शर सारख्या जहाज बांधणी केंद्राची निर्मिती होत आहे.मौजे-खनलोशी येथे प्रस्थावित असलेली MIDC निर्मिती झाल्यास या परिसरातील बेरोजगारीचा प्रश्नच संपुष्ठात येईल परंतु सध्या दिघी पोर्ट विकासा संदर्भात शंका निर्माण केली जात आहे.स्थानिक नेतृत्वाने या मध्ये लक्ष घालून स्थानिक तरुणांचे स्वप्न साकार व्हावेत याकरीता महाराष्ट्र राज्याच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मा.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय पॉव्हर व्हेसल डॉक होईल का ? तसं झाल्यास नक्कीच या जागतिक दर्जाच्या अदानी पोर्टला चालना मिळेल,अशी चर्चा परिसरातील सुजाण नागरिकांच्या कडून बोलले जात आहे.व या जटिल प्रश्नांनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक प्रतीक्षेत बसले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test