Type Here to Get Search Results !

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन.


रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुलजी गांधी यांना सूडबुद्धीने सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) नोटीस देण्यात आली होती. या संदर्भात राहुलजी गांधी ईडी कार्यालय दिल्ली येथे उपस्थित राहिले.परंतु ईडी त्यांना मागील तीन दिवसांपासून चौकशीसाठी बोलावून त्रास देत आहे. सतत चौकशीसाठी बोलावणे व दिल्ली येथील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी कार्यालयास पोलिसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे अशा प्रकारची दडपशाही केंद्र सरकारची सुरु आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कामिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस भवन अलिबाग येथून मोर्चाने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चाप्रसंगी भाजप सरकार व ईडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चिटणीस तथा रायगड सह्प्रभारी श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस नंदाताई म्हात्रे, रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष किरीट पाटील, महिला अध्यक्षा एडव्होकेट श्रद्धाताई ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, युवक अध्यक्ष निखील डवले तसेच शेकडोंच्या संख्येने कॉंग्रेस नेते, पदाधिकारी आणि कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test