नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. रंजना राऊत बिनविरोध
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन नागोठणेकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वी रित्या पुर्ण केल्यानंतर स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत तडजोडीनुसार त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दि. ०८ रोजी दुपारी तीन वाजता नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक ५ चा महत्वाचा भाग असलेल्या खडक आळीतील शिवसेनेच्या सदस्या सौ. रंजना रविंद्र राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांनी जाहिर केले.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत किंगमेकरची भुमिका बजावणारे मार्गदर्शन शिवसेना नेते किशोर जैन यांच्या समवेत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, राजेश पिंपळे, सदस्या सुप्रिया महाडिक, कल्पना टेमकर, भक्ती जाधव , रुपाली कांबळे, मीनाक्षी गोरे, दिलनवाज अधिकारी, रोजिना बागवान, श्रीमती मंगी कातकरी, कार्यालयीन प्रमुख प्रमोद चोगले आदींसह प.स.सदस्य बिलाल कुरेशी, सिराज पानसरे, अशपाक पानसरे, विठ्ठलतात्या खंडागळे, सुनील राऊत, नितीन राऊत, सद्दाम दफेदार, पप्पूशेठ अधिकारी, प्रकाश कांबळे, शिवसेना विभागीय महिला संघटक दिप्ती दिपक दुर्गावले, श्रेया कुंटे, प्रियांका पिंपळे आदींसह कार्यकर्ते व खडक आळीतील ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित खडकआळी येथील जेष्ठ तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी विठ्ठलतात्या खंडागळे यांनी आपल्या आळीतील सौ. रंजना राऊत यांना उपसरपंचपदी विराजमान करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे शिवसेना नेते किशोर जैन व विद्यमान सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचे तसेच उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानत धन्यवाद दिले.
सतरा सदस्य असलेल्या नागोठणे ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच पद व १० सदस्यांसह पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे ७ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस कडून राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळत उपसरपंच पदासाठी कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे रंजना राऊत यांची बिनविरोध निवड झाली. तदनंतर उपस्थित शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालया समोर फटाक्यांची आतषबाजी करुन आपला आनंद व्यक्त केला. या निवडणूक प्रक्रियेत नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
*नागोठणे शहर व विभागाच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यावे - किशोर जैन*
गेली चार वर्षे सर्वांच्या सहकार्याने कारभार उत्तमरीत्या सुरु आहे.नागोठणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर स्थानिक पातळीवरील त्यावेळीस घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवड करण्यात आली असून सर्वसामान्य कुटुंबातील महिलेस उपसरपंच पदी विराजमान करताना अतिशय आनंद होत असल्याचे यावेळी किशोर जैन यांनी स्पष्ट केले. जसा नागोठणे रोल मॉडेल बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरले तसेच संपूर्ण नागोठणे विभाग मला रोल मॉडेल बनवायचा आहे. नागोठणे जि.प. मतदार संघात १० कोटींची कामे मंजूर करुन आणल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर हर घर नळ या योजनेतून अर्धवट राहिलेली शुद्ध पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल अशी ग्वाही दिली. गाजावाजा न करता विकासकामे करत आलो आहे आणि यापुढेही कायम करत राहणार आहे.तसेच नागोठणे शहर व विभागाच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यानी केले.