रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
रोटरी एज्युकेशन सोयायटीच्या रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल, ज्यु. कॉलेज ,बोरी उरण कॉलेजचा इयत्ता १२ वी २०२२ चा निकाल १००% लागलेला आहे. रोटरी एज्युकेशन सोयायटीचे अध्यक्ष शेखर द्वा . म्हात्रे , उपाध्यक्ष यतिन म्हात्रे , सचिव विकास महाजन , खजिनदार प्रसन्नाकुमार व सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे , पालकांचे व शिक्षका वर्गाचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्रशासकीय अधिकारी , प्रिन्सिपल व मुख्याधापक यांनी सुद्धा उत्तीर्ण झालॆल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
कॉलेजच्या वाणिज्य शाखे मध्ये एकूण ६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. पांडे वैशाली रमेश हि ८३.३३ % मिळवुन कॉलेज मध्ये प्रथम आली असून संस्थेचे अध्यक्षांनी तिचे अभिनंदन केले आहे व सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मन : पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. कॉलेजचे अनेक वर्षे १०० % निकाल लागत असल्याने उरण व रायगड जिल्हा मध्ये रोटरी शाळा व कॉलेजचे विषेश अभिनंदन होत आहे.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून विज्ञान शाखेची सुरवात करून रोटरी शाळेने यशाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सदर वर्षी २०२२-२३ मध्ये विज्ञान शाखेत प्रवेशा साठी शाळेच्या विश्वस्तांनी विद्यार्थाना विशेष आवाहन केले आहे. आणि शुभेच्छा दिल्या आहेत.