Type Here to Get Search Results !

आ. रवीशेठ पाटील यांच्या हस्ते नागोठणे विभागातील विविध विकासकामांचे रविवारी लोकार्पण


आ. रवीशेठ पाटील यांच्या हस्ते नागोठणे विभागातील विविध विकासकामांचे रविवारी लोकार्पण


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 पेण सुधागडचे विद्यमान कार्यसम्राट आमदार रवीशेठ पाटील यांनी नागोठणे शहर व नागोठणे विभागात त्यांच्या आमदार निधीतून विकास कामांना निधी देण्याचा धडाका सुरू ठेवलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे विभागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार व माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ५ जून रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार असल्याची माहिती भाजपाचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी दिली. 

या लोकार्पन सोहळ्याची सुरुवात नागोठण्याजवळील पळस गावाची ग्रामदेवता श्री पळसाई मातेचे दर्शन घेऊन होणार आहे व शेवट जिल्ह्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ नेते शि.ल. पाटील यांची त्यांच्या वेलशेत येथील निवासस्थानी भेट घेऊन वेलशेत येथे होणार आहे.


आ. रविशेठ पाटील यांच्या या लोकार्पन सोहळ्यात 
नागोठणे विभागातील पळस येथील अंतर्गत रस्ता, वाघळी येथील अंतर्गत रस्ता, निडी येथील समाज मंदिर, वासगाव येथील धनगर वाडी तील अंतर्गत रस्ता, चिकणी येथील अंगणवाडी, पाटणसई येथील अंतर्गत रस्ता, हेदवली येथील अंतर्गत रस्ता, बाळसई येथील अंतर्गत रस्ता, वरवठणे येथील रस्ता, पिंगोडे शाळा ते आंबेघर रस्ता कॉंक्रिटीकरण, आंबेघर येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, वेलशेत येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, वेलशेत येथील व्यायाम शाळा या विकासकामांचा समावेश आहे. 
या कार्यक्रमास नागोठणे शहर व विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी व विभागीय अध्यक्ष संतोष लाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test