पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये मुलांना योगा करण्याचे महत्त्व समजावे यासाठी योग दिन साजरा केला जातो.
पोलादपूर तालुक्यातील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला युवा पिढीला योगा करण्याचे महत्त्व समजावे यासाठी महाविद्यालय मध्ये योग दिन साजरा करण्यात आला प्रा. डॉक्टर वसंत डोंगरे प्रा. डॉक्टर बालाजी राजभोज यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले तसेच ध्यानधारणा व योगासने केल्याने कशाप्रकारे निरोगी आयुष्य जगता येईल याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक सौ ज्योती रावेरकर यांनी योगा हे मनाला स्थिर ठेवण्याचे शास्त्र असून निरामय आयुष्य जगण्यासाठी नियमितपणे योग तसेच ध्यानधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक रावेरकर यांनी विद्यार्थ्यांना योगा करण्याचे महत्त्व समजावून सांगितले तसेच प्रशिक्षकांच्या साह्याने सर्व विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची योगा असणे करून घेतली तसेच योगा केल्याने आपण निरोगी राहू शकतो व शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धन करण्यासाठी कोणत्याही समस्या भविष्यात येणार नाही असे सांगून प्राचीन भारतीय परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत रहावे असे आवाहन केले.
प्रा. डॉक्टर वसंत डोंगरे, प्रा. डॉक्टर राम बरकुले, प्रा. डॉक्टर जयश्री जाधव, प्रा. डॉक्टर शैलेश जाधव, प्रा. स्नेहल कांबळे, प्रा. डॉक्टर मंगेश गोरे, उपप्राचार्य सुनील बलखंडे, कार्यालय अध्यक्ष श्री मुकुंद पंढेरकर यांच्यासह सर्व उपस्थित प्रा. यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना योगासन करण्यात मार्गदर्शन केले.