योगाभ्यास हिच जीवनशैली असावी, योगा असाध्य रोगाना नियंत्रण करतो : प्रा. आर. एस. माशाळे
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
कोकण उन्नती मित्र मंडळाचे,वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्याने प्रा.आर.एस.माशाळे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक वृदांना योगासना विषयी सखोल माहिती देऊन योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखवले.आधुनिक पर्यावरणीय जीवनात युवकांना योगाचे महत्व पटवून दिले. आजची पिढी अनेक समस्याने ग्रस्त आहे.भारतात चाळीस टक्के लोक मधुमेहाने पिडीत आहेत.उच्च रक्तदाब असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.कमी वयातील युवकांमध्ये हृदयरोगाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे.अनेक महिला थायराॅईडमुळे ग्रस्त आहेत या सर्व रोगावर मात करण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही असे प्रा.माशाळे यांनी पटवून दिले. भारतात पाच हजार वर्षांपूर्वी ऋषी मुनींची योगाभ्यास हिच जीवनशैली होती.योगा द्वारे ऋषींनी भगवान शंकराकडुन वरदान मागून घेतले.भगवान श्रीकृष्ण योग मुद्रेत असतानाच पारध्यानी पायाच्या तळव्यावर बाण मारला व कृष्ण गतप्राण झाले असे रामायण आणि महाभारतातील असंख्य उदाहरणे या वेळी दिली.ई.सन पूर्व दुसऱ्या शतकात पतंजली ऋषींनी योगाला खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूप व शास्त्रीय आधार देऊन संपूर्ण जगाला परिचित करून दिला.पतंजलीनी योग विद्येवर अनेक ग्रंथ लिहिली त्याला शास्त्रीय आधार दिला.तेव्हाच आज संपूर्ण जग योग विद्या स्विकारत आहे.अशा सोप्या पद्धतीने प्रा. माशाळे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य डी.ए. टेकळे,प्रा.जाधव एम.एस, प्रा.डाॅ.उत्तम बेंद्रे,प्रा.शिरीष समेळ,प्रा.सुमित चव्हाण,विद्यार्थीनी मध्ये प्रात्यक्षिके करण्यासाठी कु.मल्लिका तांबे हीने सहकार्य केले.महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डाॅ.बेंद्रे सर यांनी मानले.
फोटो