Type Here to Get Search Results !

म्हसळा आयटीआय मध्ये प्राचार्यांसह अनेक पदे रिक्त◆ नवनवीन कोर्स उपलब्ध करणे गरजेचे आहे


म्हसळा आयटीआय मध्ये प्राचार्यांसह अनेक पदे रिक्त

◆ नवनवीन कोर्स उपलब्ध करणे गरजेचे आहे

● तालुक्याचा शैक्षणिक दर्जा खालावतोय

● पालक वर्ग चिंतेत


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


आयटीआय (ITI) कोर्स विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि लवकरात लवकर काम मिळवणे सोप्पे होते. या उद्देशाने पालकांनी मुले शिक्षणासाठी पाठविली परंतु म्हसळा आयटीआय ITI मध्ये प्राचार्य, इन्स्ट्रक्टर (शिल्प निदेशक) ची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थी नक्की काय शिकतात असा प्रश्न पालकांना पडला असून तालुक्याच्या शैक्षणिक दर्जाबाबत पालक नाराज आहेत. 
   एकीकडे श्रीवर्धन मतदारसंघाचा झपाट्याने विकास होत असल्याचे बोलले जात आहे परंतु याच श्रीवर्धन मतदारसंघातील महत्वाचा व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या म्हसळा तालुक्यात विविध समस्या आजही तशाच आवासून आहेत, त्यातील एक समस्या म्हणजे या तालुक्याचा शैक्षणिक दर्जा खालावतोय या कडे लक्ष द्यायला येथील लोकप्रतिनिधीना वेळ मिळत नाही, तसेच तालुक्याच्या वेशिवरच आंतराष्ट्रीय दर्जाचे दिघी पोर्ट बंदर विकसित होत आहे. याठिकाणी आयटीआय केलेल्या अनेक कामगारांना काम मिळू शकते, या दृष्टीने म्हसळा आयटीआय येथे नवनवीन कौशल्य विकास बाबत कोर्स उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
  म्हसळा आयटीआय मध्ये वीज तंत्री, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक, जोडारी, संधाता, नळ कारागीर, शिवण व कर्तन हे ट्रेड आहेत. या सहा ट्रेड साठी १३२ विद्यार्थाना मंजूरी असताना केवळ ९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राचार्य आणि इन्स्ट्रक्टर (शिल्प निदेशक) यांचा संपर्क कमी असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाल्याची तक्रार आहे.
म्हसळा आयटीआय मध्ये प्राचार्य, शिल्प निदेशक वीज तंत्री, शिल्प निदेशक जोडारी, शिल्प निदेशक संधाता, शिल्प निदेशक नळ कारागीर ही तांत्रिक पदे रिक्त आहेत, कार्यालयीन व्यवस्थापनातील कनीष्ठ लिपीक १, सहा.भांडारपाल १, चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ अशी पदे रिक्त आहे. कार्यालयीन मंजूर पदांपैकी ६४ % पदे रिक्त आहेत. तांत्रिक व कार्यालयीन कामकाजा साठी १४ पदे मंजूर असून केवळ ५ पदे कार्यरत आहेत. श्रीवर्धन टेक्नीकल हायस्कूलच्या प्राचार्याकडे, म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव आयटीआय, असे ३ प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यभार आहे. विज बील थकीत रहाते म्हणून म्हसळा आयटीआयचे वर्षातून ३ वेळा पॉवर कट केल्याच्या घटना घडतात.

प्रतिक्रिया :- 

" श्रीवर्धन -म्हसळा तालुक्याचा पर्यटन, व्यवसायीक आणि औद्योगिक विकास सुरु असताना ट्रेड ६ आणि केवळ २ इन्स्ट्रक्टर (शिल्प निदेशक) हे चुकीचे आहे. भविष्यांत मोटर व्हेकल मॅकॅनिक, मरीन फिटर, डीझेल मॅकॅनिक, को.पा. कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (Computer operator & Programing Assistant) ह्या पैकी ट्रेड सुरु होणे आवश्यक आहे." 
निलेश मांदाडकर
सरपंच - खरसई ग्रामपंचायत

"म्हसळा आयटीआय मध्ये ६ ट्रेड कार्यरत असताना केवळ २ ट्रेडना शिक्षक असणे, १३२ विद्यार्थाना मंजूरी असताना केवळ ९६ विद्यार्थी प्रवेश घेणे हे आयटीआय प्राचार्य आणि आस्थापनेतील उणीवा आहेत. प्राचार्यांचे स्थानिक लोक प्रतिनिधी, ग्रामस्थांजवळ संवाद असता तर सर्व ट्रेड भरभरून चालतील."
रियाज फकीह
माजी सरपंच - वरवठणे ग्रामपंचायत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test