कणघर ग्रामपंचायत सरपंच पदी धनंजय सावंत यांची बिनविरोध निवड
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
कणघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच कै.श्रीपत धोकटे यांचे दि.02 जानेवारी 2022 रोजी दुःखद निधन झाल्याने कणघर ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. सदर जागेसाठी दि.13 जून 2022 रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या सरपंच पदाच्या जागेसाठी एकमेव उमेदवार श्री.धनंजय सखाराम सावंत यांनी अर्ज दाखल केला होता.
एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक असलेले धनंजय सावंत यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याने तालुक्यातून सर्व स्थरातून मित्र परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सरपंच पदाची मिळालेली संधी ही लोककल्याणकारी कामे करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात आदर्श ग्रामपंचायत होण्यासाठी सर्वोतोपरी काम करणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त सरपंच धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी सलीम शहा, तलाठी पांडुरंग कळंबे, ग्रामसेवक ठाकरे, माजी सरपंच संतोष नाना सावंत, ग्राप सदस्य सुभाष चव्हाण, शुभांगी गुजर, स्मिता मोरे, प्रगती धोकटे रविंद्र सावंत, बाळकृष्ण गुजर, यशवंत सुर्वे, सुरेश पातेरे, रामकृष्ण सावंत व ग्रामपंचायत हद्दीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.