Type Here to Get Search Results !

म्हसळा शहरात परराज्यातील मजुर इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या


म्हसळा शहरात परराज्यातील मजुर इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


   म्हसळा पोलिस ठाणे हद्दीत गेल्या महिन्याभरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या चार घटना घडल्या आहेत. गुरुवार दिनांक १६ जुन२०२२ रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान म्हसळा गवळवाडी येथील अविनाश बोरकर यांच्या निवास्थानी भाडे तत्वावर वास्तव्यास असणाऱ्या रमेश गुरान्ना अर्जुंगी वय वर्षे ४० वर्षे मुळचा कर्नाटक राज्यातील बैरवाडगी, जिल्हा बिजापूर येथील रहिवाशी याने घराचे स्लापचे छताला असलेल्या लोखंडी हुकाला लुंगीचा फास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत इसम विवाहित असुन तो म्हसळा येथे खाजगी ट्रॅक्टरट्रॉली मालकाकडे चालक म्हणून कामाला होता. घटनेची खबर मयताचा भाऊ रवी अर्जूंगी याने म्हसळा पोलिस ठाणेत दिली असता पोलिसांनी आक्समात मृत्यु १२/२२, सीआरपिसी १७४ प्रमाणे नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार श्रीमती पाडगे या करीत आहेत.
याआधी सुद्धा घरगुती किरकोळ कारणाचे वादविवादातून मोलमजुरीसाठी आलेल्या दोन कुटुंबातील विवाहित महिला (युपी) व विवाहित पुरुषाने (कर्नाटक) गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test