Type Here to Get Search Results !

म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात "शिवस्वराज्य"दिन साजरा


म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात "शिवस्वराज्य"दिन साजरा


रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा 


महाराष्ट्राचे आराध्य दैवत,छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर आखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. या महान राष्ट्र निर्मात्या जाणता राजाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा महत्वाचा दिवस म्हणजे 6 जुन 1674 म्हणजेच "शिवराज्यभिषक दिन"स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस महाराष्ट्र शासनाने "शिवस्वराज्य"दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरविले आहे.सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे सोमवार दि.6 जून 2022 रोजी 349 वा "शिवस्वराज्य दिन" साजरा करण्यात आला.माजी सभापती महादेव पाटील,संचालक मंडळ सदस्य सुनिल उमरोटकर गुरुजी,सचिव अशोक काते,कृषी मंडळ अधिकारी राजेंद्र ढंगारे,युवा सेना अधिकारी कोस्तुभ करडे,ग्रंथपाल उदय करडे,कृषी पर्यवेक्षक डी.पी.सरनाईक,पत्रकार अरुण जंगम,सायली चोगले आदि मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवपुतळ्याचे पूजन,शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test