Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.


पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


                छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी रायगडावर येत असतात तसेच अनेक शाळा-महाविद्यालय उत्साहात साजरा केला जातो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच इतिहासाला उजळणी मिळावी यासाठी शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
            शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त पोलादपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून महाविद्यालय पर्यंत शिवज्योत आणण्यात आली महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील बलखंडे व कार्यालय अधीक्षक श्री मुकुंद पंढेरकर प्राचार्य सुनील गवळी आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
                 महाविद्यालयातील साहिल शिवगण आणि अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी विषय पोवाडे सादर केले.
          प्राचार्य डॉक्टर राम बरकुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यकारभार पद्धती लोकशाही तसेच सामान्य जनतेसाठी केलेले कार्य याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच महाराजांना रयतेचा राजा ही सार्थ पदवी प्रदान केली असेही नमूद केले. प्राचार्य डॉक्टर वसंत डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test