Type Here to Get Search Results !

सामाजिक बांधिलकीची जपली जाण !श्रमदानातून साकारलं कार्ला डोंगर स्वच्छता अभियान.


सामाजिक बांधिलकीची जपली जाण !

श्रमदानातून साकारलं कार्ला डोंगर स्वच्छता अभियान.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


लोणावळा ,वेहेरगाव येथे निसर्गरम्य परिसरात कार्ला डोंगरावर आगरी,कोळी,कराडी बांधवांचे श्रध्दा स्थान आणि आराध्य दैवत असलेल्या श्री आई एकविरादेवी मातेचं सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा विलोभनीय कार्ला डोंगर परिसर जेथे एकविरा आईच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्यां संख्येने भाविक आणि पर्यटक येत असतात.येथे येणारा प्रत्येक भक्तगण हा भाव-भक्ती भरल्या श्रद्धेने येतात तर काही पर्यटक आईच्या दर्शना बरोबरच तिथे असणारी लेणी पाहण्यासाठी येतात !
       याच कार्ला डोंगरमाथा परिसरात एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते उरण,पनवेल तालुक्यात आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात आपल्या अनमोल योगदानातुन अनेक सामाजिक उपक्रम राबवून विविध समाजहितांची कार्य साकारणाऱ्या दोन संस्था अर्थात जे.एम.म्हात्रे.चॅरिटेबल संस्था पनवेल आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि (उरण)या दोन सामाजिक संस्थांनी आपल्या माध्यमातून आणि मित्र परिवाच्या वतीने आई एकविरा मातेच्या कार्ला डोंगर माथ्यावर एक आदर्शवत अभियान राबविण्यात आले ते म्हणजे कार्ला डोंगर स्वच्छता अभियान.

या अभियाना अंतर्गत उरण - रायगड येथील जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल सामाजिक संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रीतम दादा म्हात्रे आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्विचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी आपल्या माध्यमातून आपल्या मित्र परिवाराला सामजिक बांधीलकीच्या भावनेतून श्रमदाना करिता एक आवाहन केले होते.आणि त्यांच्या याच आवाहनाला साथ देतं राजू मुंबईकर आणि मित्रपरिवारातील सर्व बंधू- भगिनीं, बच्चे कंपनी आणि सहकारी मंडळींच्या श्रमदानातुन श्री आई एकविरा मातेचा कार्ला डोंगर परिसर स्वच्छ करण्यात आला.


लोणावळा ,वेहेरगाव येथील आई एकविरा मातेच्या मंदिर परिसराच्या आजूबाजूला आणि मंदिर वाटे वरील पायऱ्यांवर पडलेल्या प्लस्टिक बोटल्स, आणि कचरा उचलून तिथला परिसर साफ - स्वच्छ करण्यात आला.आणि हे सर्व करत असतानां तेथे दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भक्तांनी आणि पर्यटकानीं या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या चीमुकल्या बाळ गोपाळांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.आणि शाबासकी देतं या सुंदर कार्याची वाहव्वा देखील केली. या आदर्शवत प्रेरणादायी कार्ला डोंगर स्वच्छता अभियाना अंतर्गत श्रमदान शिबिरातं सहभागी झालेल्या सर्व सहकारी मित्र परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक केले जातं आहे.आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होतांना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test