पोलादपूर तालुक्यातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दुर्गराज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर स्वच्छता अभियान संपन्न
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक ठिकाणाहून शिवभक्त ही राज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात श्रद्धा पूर्ण वातावरणात संपन्न झाला रायगडावर लाखोंच्या संख्येने जमा झालेल्यांने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता
७ जून मंगळवार रोजी पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा आयोग विभाग अंतर्गत स्वयंसेवक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शैलेश जाधव आणि डॉक्टर राम बरकुले यांनी गटाचे नेतृत्व केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिपक रावेरकर यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेऊन स्वयंसेवकांच्या मदतीने रायगडावरती राज्याभिषेकाची दिनादिवशी निर्माण झालेला कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश दिला तसेच अनेक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा आयोग विभागातील स्वयंसेवक देखील उपस्थित होते सर्व ऐतिहासिक वस्तू स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला.
अशाप्रकारे सर्वांनी मिळून ऐतिहासिक वास्तू सार्वजनिक ठिकाणी योग्य ती स्वच्छता ठेवावी असा संदेश दिला.