• गुणवत्तापुर्ण निकालाची परंपरा अखंड सुरूच....
• वि. गो. लिमये विद्यामंदिर दिवेआगरचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १००%
• यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
रायगड वेध अनिकेत पिळणकर दिवेआगर
सन २१/२२ या शैक्षणिक वर्षाचा पंचतन शिक्षण संस्थेच्या वि. गो. लिमये विद्यामंदिर दिवेआगरचा एस. एस. सी परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.
गुणवत्ता पुर्ण निकालाची परंपरा याहीवर्षी सुरूच राहिली आहे. पंचक्रोशीतून याबद्दल विशेष कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एस. एस. सी. परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पंचतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय तोडणकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे प्राचार्य यांनी झुम सभेद्वारे तंत्रशास्त्र विद्यापीठामधील प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागपत्रांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.
पंचतन शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै. केशवदादा म. पाटील यांचे स्मरणार्थ त्यांची कन्या सौ. श्रद्धा अनंत केमनाईक यांचेकडून इ. १० वी मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम ₹ ७०००/- हे कुमारी स्वरा दिलीप पाटील (९१.२० %) हिस, द्वितीय क्रमांक पारितोषिक ₹ ५०००/- हे कु. श्रीतेज प्रदिप कांबळे (८७.४० %) यास व तृतीय क्रमांक पारितोषिक ₹ ३०००/- हे कुमारी ग्रिष्मा जयेश कोसबे (८७.२० %) हिस पंचतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय तोडणकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्थाचालक, मुख्याध्यापिका सौ. रश्मी अडूळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.