Type Here to Get Search Results !

गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा १०वी निकाल ९६.७० % तर प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळीचा ९०.९१% निकाल.


गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा १०वी निकाल ९६.७० % तर प्र.म.जोशी प्रशाला पन्हेळीचा ९०.९१% निकाल.


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 शुक्रवारी एस् एस् सी.च्या विद्यार्थ्यांचा दुपारी १ वाजता ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर तळा चा एकूण निकाल ९६.७०% लागला.तर प्रभाकर.म.जोशी प्रशाला पन्हेळीचा ९०.९१%निकाल लागला आहे.यामध्ये गो.म.वेदक विद्यामंदिर शाळेत प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर यशवंत कांबळेकर ८८.६०%,द्वितीय क्रमांक गौरव राजाराम थोरात ८६.६०% व तृतीय क्रमांक तेजस गणेश शिंदे ८३ % घेऊन उत्तीर्ण झाले.या केंद्रातून एकूण ९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी तीन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर पन्हेळी हायस्कूलचा निकाल ९०.९१% लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक विनया विजय महागावकर ८५.८०% द्वितीय क्रमांक मयुरी गोपाळ देवकर ८१.४०% तर तृतीय क्रमांक पूजा शरणप्पा बंडगेर ७६.२०% क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.या केंद्रातून एकूूण ११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असून १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा हा दहावीचा निकाल असल्याने याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे तालुक्यात तळे शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक.विद्यामंदिर तळा व डॉ. प्रभाकर म.जोशी प्रशाला पन्हेळी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १०वी च्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी प्राचार्य शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test