म्हसळा सार्वजनिक वाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज म्हसळा सार्वजनिक वाचनालयात साजरी करण्यात आली, यावेळी ग्रंथपाल उदय करडे यांचे हस्ते श्री सरस्वती आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले यावेळी वाचक प्रशांत करडे, जावेद रज्जाक शेख,पूनम राठोड, बालवाचक श्रध्दा, सिध्दी उपस्थित होत्या.२६ जून १८७४साली जन्मलेल्या शाहू महाराजानी दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली. त्यामुळे दलित आणि बहुजनांचे कैवारी म्हणून त्याना ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासन २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करते,शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला, स्त्री पुनर्विवाह कायदा केला. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले.असे करडे यानी सांगितले.