Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील अनेक खेडेगावांमध्ये मोबाईल नेटवर्क अल्पप्रमाणात.


पोलादपूर तालुक्यातील अनेक खेडेगावांमध्ये मोबाईल नेटवर्क अल्पप्रमाणात.


रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
   

                  पोलादपूर तालुक्यातील खेडे गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अतिशय कमी प्रमाणात येत असल्याने गावांमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
             आज काल मोबाईल खूप महत्त्वाचे झाले आहेत परंतु अनेक गावांमध्ये मोबाईल आहेत परंतु मोबाईल नेटवर्क मात्र अतिशय कमी प्रमाणात आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होताना पहावयास मिळत आहे. मोबाईल नेटवर्क कमी प्रमाणात असल्याने ग्रामस्थांना कोणाशीही संपर्क साधता येत नसल्याने अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत कधी कधी तर १५ ते २० दिवस ही मोबाईल नेटवर्क येत नसल्याने मोबाईल संदर्भात असलेली कामे देखील होत नाहीत त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
               परसुले, कोतवाल, हलदुले, वडघर, बोरघर अशा अनेक तालुक्यातील गावांमध्ये बीएसएनएल या कंपनीचे सिम कार्ड वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात.
                विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यातही अडचणी निर्माण होत आहेत काही विद्यार्थी हे तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. त्यामुळे ते ऑनलाइन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु घरापासून दूर पर्यंत चालत येऊन देखील मोबाईल नेटवर्क व्यवस्थित रित्या येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गरजेच्या वेळी मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तीला त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधता येत नाही बीएसएनएल तसेच इतर खासगी कंपन्यांची ही नेटवक अल्प प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे नेटवर्क मध्ये सुधार व्हावे असे ग्रामस्थांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test