Type Here to Get Search Results !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब. • राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ऐतीहासिक निर्णय


• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब.


 • राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा ऐतीहासिक निर्णय


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


गेल्या वर्षभरारपासून प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चित विषय असलेला येथील स्थानिक भूमिपुत्र यांची जोरदार मागणी असलेली नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळास अखेर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारने समोपचाराची भूमिका घेत या प्रकल्पास अखेर या भागाचे भाग्यविधाते दिवंगत लोकनेते. दि. बा पाटील यांचे नाव देण्याचे मान्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला रायगड जिल्हा महाविकास आघाडीचे सर्वच नेतेमंडळी उपस्थित होते.यावेळेस नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव देण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. यावर बोलतांना श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले कि या विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव हा सिडकोने घेतला होता. महाविकास आघाडी सरकाने न्हवता घेतला त्यामुळे सिडकोने घेतलेल्या ठरावाला कोणीच पाठिंबा किंवा तो ठराव आम्ही पुढे केला नाही. तेथील स्थानिक जनतेची मागणी आहे कि तेथील विमानतळास दिवंगत लोकनेते.दि. बा पाटील यांचे नाव देण्यात यावे. यात काही गैर नाही. कारण दि बा पाटील हे आमचे मोठे नेते होते असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले.  या विमानतळास लोकनेते दि. बा पाटील  यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करून त्या संदर्भाचे पत्र सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. व राज्य काँग्रेस ओबीसी सेलने तर तसा ठरावच पारीत केला होता.यासाठी उरण पनवेल महाविकास आघाडीचे नेते  बबनदादा पाटील ,द्वारकानाथ भोईर,काँग्रेसचे नेते.R C. घरत, शिवसेनेचे माजी आमदार. मनोहरशेठ भोईर,शेकापचे आमदार बाळाराम पाटील,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत ,काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे , शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, अभिजित पाटील,राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुदाम पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.याबद्दल राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विविध प्रकल्पग्रस्त संघटनेने, विविध संस्थांनी, स्थानिक भूमीपुत्रांनी मनःपूर्वक  आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test