Type Here to Get Search Results !

माझी वसुंधरा" स्पर्धेत कोकण विभगात म्हसळा नगरपंचायतीच्या उत्कृष्ट कामगिरीचा महाराष्ट्र राज्य शासनाने केला सन्मान


"माझी वसुंधरा" स्पर्धेत कोकण विभगात म्हसळा नगरपंचायतीच्या उत्कृष्ट कामगिरीचा महाराष्ट्र राज्य शासनाने केला सन्मान


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शास्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या "माझी वसुंधरा" 2.0 सन 2021/22 या स्पर्धेत म्हसळा नगर पंचायतीने नगर पंचायत गटात कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने पर्यावरण विभागाने मुंबई येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळयात जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटन विकास व पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष असहल कादरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, नगरसेवक संजय दिवेकर, स्वच्छता समन्वयक कुमारी प्रियंका चव्हाण यांचा प्रमाणपत्र देवुन यथोचित सन्मान करण्यात आला. नरिमन पॉइंट मुंबई, टाटा नाट्य मंदिरात आयोजीत सन्मान सोहळ्यात प्रधान सचिव मनिषा पाटणकर, म्हैसकर (भा.प्र.से), अभियान संचालक सुधाकर बोबडे, पर्यावरण व वातावरण विभागप्रमुख, म्हसळा शहर युवक कार्यकर्ते नईम दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
   माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भुमी, जल, वायु, अग्नी व आकाश या निसर्गाचे निगडीत पंचतत्वावर आधारित स्थानीक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेत म्हसळा नगर पंचायतीने भाग घेतला असता कोकण विभागात पर्यावरण, संवर्धन व संरक्षण जतन करण्यासाठी चांगले योगदान देत म्हसळा शहर नगर पंचायतीने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे येथोचित सन्मान करण्यात आला. कोकण विभागात रायगड जिल्ह्यातुन म्हसळा नगर पंचायतीने "माझी वसुंधरा अभियान" स्पर्धेत सन्मान प्राप्त केल्याने खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री ना.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी तसेच तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व लोकप्रतीनिधींनी शुभेच्छा देवुन अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test