Type Here to Get Search Results !

गाव विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - आमदार अनिकेत तटकरे यांचे आश्वासन


गाव विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - आमदार अनिकेत तटकरे यांचे आश्वासन

● मेंदडी गणात दोन कोटीचे विविध विकास कामांचे आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते उदघाटन


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


   खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे विशेष प्रयत्नामुळे आणि त्यांचे विकास निधींतून मंजुर करण्यात आलेल्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी गणातील तुरुंबाडी, आडीठाकुर, रोहिणी, वारळ आणि मेंदडी येथील दोन कोटी रुपये खर्च करून मंजुरी देण्यात आलेल्या विविध लोकपयोगी विकास कामांचे उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते संपन्न झाले आहे. विकास कामांमध्ये प्रामुख्याने आडीठाकुर येथे सामाजिक सभागृह, रोहिणी येथे अंगणवाडी इमारत, रोहिणी आबाजी मंडळ सामाजिक सभागृह, ओमशिव कलापथक सभागृह, तुरुंबाडी नळपाणी पुरवठा योजना, शाळा सभागृह आणि सामजिक सभागृह उद्घाटन, मंचेश्र्वर मंडळ सामाजिक सभागृह उद्घाटन, प्राथमिक शाळा गृहाचे उद्घाटन, वारळ येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता विकास भूमिपूजन आणि मोहल्लाकडे जाणाऱ्या रस्ता बांधकामाचे उद्घाटन, मेंदडी क्रांती नगर सामाजिक सभागृह उद्घाटन, मेंदडी येथे आगरी समाज लोकवस्ती असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन असे सुमारें दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेल्या विविध लोकपयोगी विकास कामांचे उद्घाटन विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते मोठया थाटामाटात करण्यात आले.
   कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्साह पहाता आमदार अनिकेत तटकरे यांनी गेल्या १० ते १५ वर्षापूर्वी येथील गावागावात विकासाचा ठिगळ पडला होता त्या वेळेची विकासा बाबतची परिस्थिती अत्यंत कठीण असताना येथील जनतेने आमच्यावर कायम विश्वास ठेवून जनतेची सेवा करण्यासाठी कायम सहकार्य व साथ दिलीत त्या बद्दल धन्यवाद मानताना गाव विकास कामांत निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
  आयोजीत उद्घाटन कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे यांचे समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर, रा.जि.प. माजी सभापती बबन मनवे,समन्वय समिती अध्यक्ष नाझिम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले,जमीर नजीर, महीला अध्यक्षा रेश्मा काणसे,मिना टिंगरे,अनंत पाटील,सरपंच सुनीता नाकती,उपसरपंच गोपाळ ताम्हणकर,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,बांधकाम अभियंता मोरे,अनिल बसवत,जहुरभाई काझी,सतीश शिगवण,महेश घोले,गजानन पाखड,अनिल टिंगरे,अक्रमभाई साठविलकर,ग्रामस्थ, मुंबईकर आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test