Type Here to Get Search Results !

आंबेत - संदेरी गाव दळणळणासाठीचा मार्ग मोकळा● पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले नुतन पुलाचे उद्घाटन


आंबेत - संदेरी गाव दळणळणासाठीचा मार्ग मोकळा

● पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले नुतन पुलाचे उद्घाटन


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


माणगाव उपविभाग म्हसळा तालुका अंतर्गत येणारा आंबेत बागमांडळा राज्य मार्ग 100 वरील 13 किमी अंतरावरील लिपनिवावे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. दोन वर्षे प्रतिक्षेत असलेल्या पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याने आंबेत, संदेरी ग्रामस्थांचा व प्रवाशी वर्गाचा रहदारीचा मार्ग आता सुखकर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या नवीन आणि सुबक आराखडया प्रमाणे संदेरी पुलाचे बांधकाम हजवाने डेव्हलमेंट कंपनीने दोन वर्षाचे कालावधीत पूर्ण करून रहदारीचा मार्ग खुला करून दिलासा दिल्याने संदेरी आंबेत परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून तटकरे परिवारास धन्यवाद दिले आहेत. या पुलाचे उभारणी करण्यासाठी शासनाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे बांधकाम विभागाचे अभियंता नामदे यांनी माहिती देताना सांगितले. पुलाचे बांधकाम करताना रस्त्याचे दोन्ही बाजूला भराव करण्यात आला आहे हा केलेला भराव पावसाळ्यात रस्ता किती प्रमाणात खचणार आहे याचा अंदाज घेऊन भविष्यात येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना त्रासाचे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संदेरी ग्रामस्थांना आश्र्वासित करताना पर्यायी मार्ग व्यवस्था करण्यात आलेले माती भरावाचे बांधकाम लवकरच नष्ट करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे संबंधीत अधिकारी वर्गाला पुल उद्घाटन प्रसंगी दिले आहेत. पुलाचे बांधकाम करण्यास थोडा उशीर झाला असला तरी बांधण्यात आलेल्या सुंदर आणि सुबक पुल बांधकामाचे पालकंत्र्यांनी कौतुक केले. 
आयोजीत उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेट कोचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर, रा.जि.प.सभापती बबन मनवे,समन्वय समिती अध्यक्ष नाझिम हसवारे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष महेश शिर्के,प.स.सभापती छाया म्हात्रे,ता.महीला अध्यक्षा रेश्मा काणसे,सरपंच रसिका वाघरे,उपसरपंच आकाश मोरे,उप विभागीय बांधकाम अभियंता गणगणे,उलागदे,राऊत,सहा.अभियंता शेट्टे,संदेरी ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test