पदांचा अभाव कसा लागणार आरोग्याचा निभाव
म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत स्टाफ कमी म्हणून लसीकरणाचे लाभार्थीचा केला जातो राग
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांची उपचार नको पण दुवा दे आशी परिस्थिती आहे. रुग्णालयांत वैयकिय आधिकाऱ्यांची पदे नव्याने भरली आसली तरी रुग्णालयावर नियंत्रण असणारे वैद्यकिय अधिक्षक हे पद रिक्त आस ल्याने ग्रामिण रुग्णालयातून मिळणारे विविध दाखले लाभार्थीना मिळत नाही त्यामुळे लाभार्थी आणि कनिष्ठ सहायक यांचे सातत्याने वाद होत असतात. रुग्णालयांत महत्वाची भूमिका करणाऱ्या अधिपरिचारिकांची तब्बल ३ पदे रिक्त आहेत, सहाय्यक अधिक्षक वर्ग १, कार्यालयीन कनीष्ठ लिपीक २ पदे कार्यरत असताना १ लिपीक सेवेवर तर अन्य १ कामगीरीवर असल्याचे सांगण्यात येते. तर रुग्णालयांत क्ष किरण तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक १पद, कक्ष सेवक वर्ग ४ ची तब्बल ३ पदे रिक्त आहेत. ग्रामिण रुग्णालय सुरू होऊन ८ वर्ष झाली तरी रुग्णालयाला अधिक्षक मिळत नसल्याने कधी वैद्यकिय अधिकारी नसणे,कधी स्टाफ नसणे, त्यामुळे उर्वरीत परिचारिका व अन्य कर्मचाऱ्याची रुग्णाना सेवा देण्यात तारांबळ होत असते, त्यामुळे रुगणालयाचे सेवेची केविलवाणी परिस्थीती होते.प्रयोगशाळा सहाय्यक वर्ग ३ हे पद गेले ८वर्षात भरलेच नाही, कक्ष सेवक ४ पदे असुन ३पदे रिक्त आहेत, रुग्णालयासाठी आवश्यक असणारा Deta Entery Operetor अद्यापही नाही.लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. यासाठी बालकांच्या आरोग्या वर आरोग्य विभाग विशेष लक्ष देत असताना
अशा विविध कक्षाना माहीती, कार्यालयीन वेळ दर्शक फलक नसताना गोरगरीब रुग्णांजवळ आणि नातलगांजवळ परिचारीका उद्धटपणे वागत आसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.
" २ महीन्याच्या बालकाला आम्ही सोमवार दि. १३जून सकाळी १० वाजता रुग्णालयांत लसीकरणासाठी घेऊन आलो , लसीकरणा बाबत चौकशी केली आसताआज बालकांचे लसीकरण स.११ वाजता होईल असे सांगत परिचारिका ह्यानी उद्धट वर्तन केले, त्यामुळे छोटया बाळाना अन्य रुग्णांचे सानिध्यात तब्बल १ते२ तास रखडत बसावे लागले."
==== बालकाची आजी.
"रुग्णालयात२४ तास सेवा मिळणे आवश्यक आहे.वैद्यकिय अधिक्षकाचे पद तात्काळ भरावे, रुग्णालयांतील अनागोंदी कारभार कमी होईल. कार्यालय सकाळी १०ते सायं.६ या वेळेत उघडे आसावे, या कालावधींत कर्मचारी कार्यालयांत असणे जरूरीचे आहे.
महादेव पाटील, मा.सभापती ,पं. स. म्हसळा