• म्हसळा तालुका इयत्ता 12 वी,उच्च माध्यमिक विभागाचा निकाल 98.98%
• विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत गुणात्मक निकाल घसरला.पास झालेल्या 687 विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यादीत अवघे 22 विद्यार्थी
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा तालुका इयत्ता 12 वी चा,उच्च माध्यमिक विभागाचा निकाल 98.98% इतका लागला आहे.तालुक्यातील 6 हायस्कूल मधुन 12 वी मध्ये कला,वाणिज्य आणि शास्त्र शाखेत मिळुन एकुण 699 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती पैकी 687 विद्यार्थी पास झाले आहेत.विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत पास झालेल्यात गुणात्मक निकाल घसरला आसुन पास झालेल्या 687 विद्यार्थ्यांमध्ये म्हसळा तालुक्यातील गुणवत्ता यादीत अवघे 22 विध्यार्थी पास झाले आहेत.म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलचा निकाल 96.62% इतका आहे.कळा शाखेत 100 तर वाणिज्य शाखेत 167 विद्यार्थी असे मिळुन 267 पैकी 258 विध्यार्थी पास झाले आहेत.न्यू इंग्लिश स्कूल वाणिज्य शाखेचा निकाल 100% आहे.अंजुमन हायस्कूल म्हसळाचा निकाल 100% या हायस्कूल मध्ये कला शाखेत 09,वाणिज्य शाखेत 112 आणि विज्ञान शाखेत 141 मिळुन 262 विद्यार्थी परिक्षेला बसले होते.अंजुमन हायस्कूल गोंडघरचा निकाल 100% आहे या हायस्कूलमध्ये कला शाखेत 24 तर वाणिज्य शाखेत 41विध्यार्थी परिक्षेला बसले होते.उच्च माध्यमिक विद्यालय मेंदडीचा निकाल 94.44 इतका लागला आहे.या हायस्कूल मध्ये कला शाखेत 21 विध्यार्थी 90.47% तर वाणिज्य शाखेत 33 विध्यार्थी 96.96% निकाल आहे एकुण 54 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती.सुरय्या अली कोचाली ज्युनियर कॉलेज पांगलोलीचा शास्त्र (सायन्स) शाखेचा निकाल 100% लागला आहे.कॉलेजच्या 34 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.ग्रामीण भागात असलेल्या सुरय्या अली कोचाली कॉलेजने 100%निकालाची परंपरा कायम टिकवुन ठेवली आहे. आयडीयल ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचा निकाल 100 लागला आहे या कॉलेज मध्ये 17 विध्यार्थी परिक्षेला बसले होते. गुणात्मक दर्जा नुसार 12 वी च्या 687 पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अवघे 22 विध्यार्थी गुणवत्ता यादीत पास झाले आहेत तर प्रथम श्रेणी मध्ये 245 विध्यार्थी,द्वितीय श्रेणीत 400 आणि तृतीय श्रेणीत 20 उत्तीर्ण पास झाले आहेत.
माद्यमिक आणि उच्च माध्यमिक अर्थात 10 वी आणि 12 वी च्या वार्षिक निकालाचे पद्धतीत महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाने आमूलाग्र बदल घडवून आणला असल्याने बहुतांश विद्यालयात 100%निकाल लागत असल्याचे निदर्शनास येत असतानाच विध्यार्थी व पालक वर्गात मात्र आनंदी वातावरण पहायला मिळत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शेकडा गुणात व्यक्तीगत निकालाचा दर्जा फारच घसरला असल्याचे एकंदरीत निकालावरून स्पष्ट होत आहे. म्हसळा तालुक्यातील इयत्ता 12 वी चा एकुण निकाल 98.98%इतका चांगला लागला आहे.गोंडघर हायस्कूल कला शाखेतील काठेवाडी सारा खालिद 83.50%,टाके उमेमा अ.मुनिम 73.67%,शेख यास्मिन रोशन 71.17%,वाणिज्य शाखेतील खान आयेशा आसिफ 77.67%,मुकादम महेक सलीम 77.17%,बोदलाजी समिया झहिद77.17%,नजिर खदिजा सय्यद 75.83%,म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलआणि ज्यु. कॉलेज वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी पायल अविनाश बोरकर हिने 74.83%गुण मिळवुन हायस्कूल मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तर कला शाखेत कुमारी साक्षी सुनिल अंजारलेकर हिने वाणिज्य शाखेत 65.33%गुण प्राप्त करून पहिली आहे.हायस्कूल मध्ये मागास वर्गीय विद्यार्थ्यांत आगरवाड येथील शिवानी श्रीनाथ वर्मा हिने 67.33गुण मिळवुन यश मिळवले आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुक्यातील सर्व पक्षीय आजीमाजी लोकप्रिनिधी,शिक्षक आणि पालक वर्गानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.