Type Here to Get Search Results !

नागोठण्यातील को.ए.सो.च्या एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९५.६० टक्के


नागोठण्यातील को.ए.सो.च्या एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९५.६० टक्के


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या पातळीवर बराच काळ शाळा, कॉलेज पुर्णतः बंद होते.यावेळी या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या घेण्यात आल्या नाहीत.परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा, कॉलेज पूर्ववत सुरू होऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे संपूर्ण लक्ष निकालाकडे लागले होते. याचदरम्यान फेब्रुवारी- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दि. ०८ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परिक्षेचा कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा एकुण निकाल ९५.६० टक्के लागला आहे. यामध्ये कला शाखेचा निकाल ८७.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९४.५९ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९९.३९ टक्के लागला असल्याची महिती प्राचार्य महादेव पाटील यांनी दिली.

बारावीच्या परिक्षेत विज्ञान शाखेतील कुमारी अक्षता नारायण चोगले ही विद्यार्थीनी ७७.६७ टक्के गुण मिळवून संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कुमारी अरमिन इरफान मुल्ला हिने ७५.५० टक्के व कु. कार्तिक अमरीतलाल परमार याने  ७४.३३ टक्के मिळवून विज्ञान शाखेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेत कु.ओम श्रीकांत मिसाळ (७३.५० टक्के) याने प्रथम क्रमांक तर कुमारी मानसी रविंद्र कदम (६३.८३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक व कुमारी वैभवी द्वारकानाथ भोय (६३.६७ टक्के) हिने तृतीय क्रमांक  प्राप्त करून यशस्वी झाले. याचबरोबर कला शाखेत कु. रुतिक लिंबाजी काष्टे (५८.५० टक्के) व कुमारी पुर्वा दिनेश गायकर  (५५.५० टक्के) तर कु.अथर्व विनोद कर्जेकर (५४ टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. दरम्यान बारावीचा निकालात एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जे घवघवीत यश मिळाले आहे यासाठी काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारणारे प्राचार्य महादेेव पाटील यांंचेे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले होते.सर्व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन नरेंद्र जैन, प्राचार्य महादेव पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test