पोलादपूर तालुक्यातील देवपूर गावात सामुहिक शेतीचा अनोखा उपक्रम. कोकणात भात शेतीला नवीन चेहरा
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
कोकणात व अनेक ठिकाणी तुकड्यांमध्ये शेती केली जाते परंतु प्रथमच देवपुर गावांमध्ये तब्बल १० एकर शेती एकत्र करून सामूहिक शेती करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.
१० जून शुक्रवार रोजी सामूहिक शेती या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली असली तरी गेले काही वर्ष भर एकमेकांच्या संपर्कात येऊन शेती एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल १० एकर शेत तयार झाले व सामूहिक शेती या उपक्रमाला सुरुवात झाली यासाठी कृषी अधिकारी जाधव साहेब यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शन घेऊन तसेच संबंधित अधिकारी व सहकारी दिपक उतेकर व गावातील जेष्ठ नागरिक जगदिश महाडिक, दगडू महाडिक, महादेव शिंदे, गणपत महाडिक, बळीराम सिनकर, ज्ञानेश्वर पवार, विजय मोरे, तसेच माजी सैनिक वयोवृद्ध महिला वर्ग यांनी एकत्र येऊन एकीचे बळ हे दर्शविले.
कामानिमित्त मुंबई पुणे अशा शहरांमध्ये तरुण वर्गाला जावे लागते त्यामुळे गावातील शेती ओसाड राहते हे पाहून गावातील माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक व पोलादपूर कृषी विभाग व कृषी अधिकारी यांच्या साह्याने व मार्गदर्शनाने या अनोख्या उपक्रमाला यश संपादन केले.
तरुण वर्गाकडून शेतीला प्राथमिकता मिळावी तसेच संदेश मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.