पोलादपूर तालुक्यातील जनसेवा प्रतिष्ठान विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव मोफत. पाठ्यपुस्तक वाटप.
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील जनसेवा प्रतिष्ठान संचलित श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ शाळेमध्ये १६ जून गुरुवार रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आकर्षक सजावट करण्यात आली व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
सेमी इंग्रजी माध्यम फीमध्ये सवलत पोषण आहार व विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण व मार्गदर्शन जनसेवा प्रतिष्ठान या शाळेमध्ये करत असल्याने मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण घेता येते.
गेली दोन वर्ष कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर शाळा ही ऑनलाईन पद्धतीने सुरू होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळेशी संपर्क हा कमी प्रमाणात आला असल्याने मुलांना पुन्हा शाळेविषयी आवड निर्माण व्हावी शिक्षणामध्ये रुची वाढावी यासाठी पहिल्याच दिवशी मुलांना प्रोजेक्टर विविध शिक्षण उपयोगी गोष्टी दाखवण्यात आल्या. मुले रमावी यासाठी शाळेला आकर्षक सजावट करण्यात आली यामुळे मुले पहिल्याच दिवशी अतिशय आनंदित दिसून आली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री प्रकाश गांधी तसेच श्री अनिलकुमार भोसले उपस्थित होते तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष तृप्ती सुकाळे पालक प्रमुख म्हणून इयत्ता पहिलीच्या पालक सौ भिसे मॅडम उपस्थित होत्या. मुख्याध्यापक श्री मांढरे सर येरुणकर सर, दरेकर मॅडम, तसेच सर्व उपस्थित शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.