Type Here to Get Search Results !

म्हसळा -दिघी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम शेतकऱ्याना ठरणार अङसर : महादेव पाटील


म्हसळा -दिघी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम शेतकऱ्याना ठरणार अङसर : महादेव पाटील


 रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा  


म्हसळा -मेंदडी -दिधी या रस्त्यावरील छोटे पुलाचे रुपांतर सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत मोठया पुलात करताना नदीचे पात्रांत रिर्टनींग वॉलचे केलेले बांधकाम सदोष आणि पूलाची उंची कमी आसल्याने भविष्यांत या परिसरांतील शेतकऱ्याना तसेच,श्री नारळी पोर्णिमा, श्री गणेश विसर्जन या सारख्या सणाना नदी संगम भागात जाताना अडसर ठरू शकतो त्यासाठी बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या पुलाचे संरक्षण भिंतीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केले असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी तुंबणार आसल्याचे स्थानिकांच्या  निदर्शनास आल्याने नदी प्रवाहाचे व पुराचे पाणी पुर्वी प्रमाणे थेट समुद्र खाडीत वाहुन जाण्यासाठी बांधकामात सुधारणा करावी अशी मागणी माजी सभापती महादेव पाटील आणि पाच गाव आगरी समाज पदाधिकारी यांनी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग महाड,उप विभागीय अधिकारी श्रीवर्धन यांना म्हसळा तहसीलदरांमार्फत निवेदन देऊन केले आहे. 
यावेळी माजी सभापती महादेव पाटील यांच्या समवेत पाचगाव आगारी समाजाचे अध्यक्ष भालचंद्र गाणेकर, मनोज नाक्ती, गणेश नाक्ती, मनोरहर कांबळे, किशोर म्हात्रे उपस्थित होते.पुलाचे बांधकामा ठिकाणी मुबलक जागा उपलबध असताना पुलाचे संरक्षण भिंत चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे येथे ऐन पावसाळ्यात नदी प्रवाहाचे ,पुराचे, राजपुरी खाडीच्या उधाणाचे पाणी आडले जाऊन पाच गाव आगरी समाज सभागृह इमारत,नदी बाजुला असलेल्या खारगावखुर्द आणि सकलप परिसरातील लोकवस्तीत आणि शेतकऱ्यांचे शेतात तुंबून शेतीचे नुकसान होणार आहे असे पाटील यानी सांगितले. 

" स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक घेऊन सुधारणा करता येतील, नविन पुलाचे बांधकामाचा अडसर झाल्यास तात्काळ सुधारणा करण्यात येईल."
श्री.एस.एम. शेट्ये.
शाखा अभियंता, सा.बांधकाम.
उपविभाग श्रीवर्धन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test