Type Here to Get Search Results !

बाल गिर्यारोहक शनाया काळेने सर केला ठाणे जिल्ह्यातील भैरवगड किल्ला


बाल गिर्यारोहक शनाया काळेने सर केला ठाणे जिल्ह्यातील भैरवगड किल्ला 


 रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जिते - कुंभळमाच येथील मुळ रहिवासी असलेले पण सध्या गोरेगाव (मुंबई ) येथे वास्तव्यास असलेले नितेश काळे यांची सुकन्या बाल गिर्यारोहक शनाया काळे उर्फ चिऊताई ( वय ५ वर्षे ) हिने पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण अशी कामगिरी करून दाखवली आहे. प्रत्येक ट्रेकर्सचे स्वप्नं असलेला कठीण आणि खडतर असा जवळपास ४००० फूट उंच असलेला चित्त थरारक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेला मोरोशी चा भैरवगड किल्ला चिमुकली शनाया काळे हिने यशस्वीरित्या सर करून कौतुकास्पद कामगिरी केली असुन तिच्या या कामगिरी बाबत सर्व स्थरातून तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान १२० फूट उंचीवरून zip line Rappelling पद्धतीचा वापर करून खाली उतरणारी शनाया काळे ही पहिली बाल गिर्यारोहक ठरली आहे.

         यावेळी आयोजकांनी ट्रेकसाठी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्यात आली होती आणि हा ट्रेक बाल गिर्यारोहक शनाया काळे हिचा मामा सुरेश पोळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता.
              या आगोदर सुद्धा शनाया काळे हिने कठीण समजला जाणारा हरिहर किल्ला, आशिया खंडातील क्रमांक २ ची सर्वात मोठी व्हॅली - सांधण व्हॅली, कलावंतीण दुर्ग, स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, कूर्डूगड, देवगड, त्याच प्रमाणे देवकुंड ट्रेक असे बरेचसे ट्रेक वयाच्या ५ व्या वर्षी सर केले आहेत. या कामगिरी बद्दल शनाया काळे हिस अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test