तळा येथे शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा येथे शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तळा व कुणबी युवा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरती असलेल्या मंगल कार्यालयात दि.१९ जून रोजी शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. राजेश शिगवण, कमळाकर चोरगे, भानू मचेंकर पांडुरंग शिगवण,श्रीमती चव्हाण, कूणबी समाज अध्यक्ष नामदेव काप, गणेश वतारी पाडूरंग कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. राजेश शिगवण यांनी मी कसा घडलो याचे विश्लेषण करून एज्युकेशन,करिअर,लव्ह,मँरेज पासून विद्यार्थ्यांना करिअर कसे घडवायचे काय करायला पाहिजे नुसती पदवी प्राप्त झाली म्हणजे करिअर केले असे नसून सतत चार वर्ष विविध डिग्री मिळवण्यासाठी प्रयत्न करा मोबाईल चा वापर आपल्या महत्त्वाचे शैक्षणिक टिप्ससाठीच करा.करिअर करताना उद्देश व उद्दिष्ट समोर ठेवून करिअर करा.त्यांनतर सर्व पुढील गोष्टी आपोआप होतातच.सतत चार वर्षाचा लाभ चाळीस वर्षे पेक्षा आधिक काळ लाभणार आहे. मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की माध्यमिक उच्चपरिक्षेत मिळणारे यश मोठे नसून त्याही पेक्षा पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी या सारख्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत.असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू थिटेकर,यांनी केले तर स्वागत सुनिल बैकर सर यांनी केले.या शिबिराचा जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.