Type Here to Get Search Results !

पाणदिवेचा सुपुत्र जितेंद्र पाटील यांचा भारत श्रीमान किताब स्पर्धेत टॉप 6 मध्ये येण्याचा बहुमान.


पाणदिवेचा सुपुत्र जितेंद्र पाटील यांचा भारत श्रीमान किताब स्पर्धेत टॉप 6 मध्ये येण्याचा बहुमान.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


 उरण पूर्व विभागातील पाणदिवे गावातील शरिर सौष्ठव स्पर्धेतील उगवता तारा म्हणून चर्चेत असलेले जितेंद्र गन्नाथ पाटील यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक पदके, बक्षीसे जिंकली आहेत.आता या बक्षीस, किताब मध्ये आणखीन एका आनंदाची भर पडली असून दिनांक 26 जून 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता मेट्रो फ्लेक्स जिम बैंगलोर - (कर्नाटक) येथे नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि चॅम्पियनशिप 2022-23 मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत उरणच्या पाणदिवे गावातील जितेंद्र पाटील यांनी या स्पर्धेत भारत केसरी श्रीमान (40 ते 50 या गटामध्ये) टॉप 6 मध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे.

यापूर्वी जितेंद्र पाटील यांनी अनेक शरिर सौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन रायगड श्री, गुरुकूल श्री. द्रोणागिरी श्री, महाराष्ट्र श्री असे अनेक किताबे पटकाविली आहेत. जितेंद्र गन्नाथ पाटील यांची स्वतःची पाणदिवे येथे रायगड हेल्थ सेंटर नावाची जीम आहे. स्वतःची जीम असल्याने जितेंद्र पाटील हे भरपूर सराव करतात.त्यामुळे त्यांना हे यश गाठता आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल जितेंद्र पाटील यांच्या नातेवाईकांनी, मित्र परिवार, शुभचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मला घरातील सर्व मंडळीचे, नातेवाईकांचे, आणि मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभले. मला या स्पर्धेसाठी माझे गुरु सुदर्शन खेडेकर सर आणि विकी पाटिल(कळंबुसरे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच स्पर्धे ठिकाणी (बेंगलोर) येथे प्रांजळ पाटील, प्रशांत पाटील, किरण केदारे यांची अमूल्य अशी साथ लाभली या सर्वामुळेच मी टॉप 6 मध्ये आल्याची कृतज्ञतेची भावना जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test